रोजचा दिवस ढकलतो मी असा कसा?
रोजचा कड्यावरून मला ढकलतो मी असा कसा ?
नित्य नवे स्व्प्न जरी मी पाहतो,
रोज ध्येय माझेच बदलतो मी असा कसा ?
प्रेम खरे जरी मी शोधतो,
रोज प्रेयसी माझीच विसरतो मी असा कसा ?
पदरी आहे जरी निराशा,
रोज आशा माझीच खुलवतो मी असा कसा ?
वाहतात श्रद्धांजली (मला) का?
रोज प्रेत माझेच जाळतो मी असा कसा?
चाणक्य आहे जनता ही भोळी
रोज निती माझीच शिकवतो मी असा कसा?
ऑक्टोबर 9, 2007 at 8:42 pm
मी असा कसा ? आणि इतरही सर्वच कविता आवडल्या, आपले लेखन आणि अनुदिनी आवडली.
मार्च 9, 2008 at 3:04 pm
तुमच्या ब्लॉग्बद्द्ल आजच लोकसत्तामधे वाचलं,तुमच्या कविता,अनय हे स्फुट सगळंच दर्जेदार आहे,आवडलं!
नवा मित्र
विनायक पंडित
vinayak-pandit.blogspot.com