माझाच मी

गाव माझाच मी सोडणार आहे,
ठाव माझाच मी शोधणार आहे!!

गुंफिला प्रीतीचा गोफ तो जरी,
पाश माझेच मी तोडणार आहे!!

शत्रु नव्हतो कधी ही तुझा मी,
दंड मात्र मीच आज भोगणार आहे!!

मृत्यु नसतो प्रीतीला कदापी,
प्रेत माझेच मी जाळणार आहे!!

घाव घाला रे कुठे ही कोणी ही,
वेदना हा चाणक्य सोसणार आहे!!

4 Responses to “माझाच मी”

  1. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे Says:

    मृत्यु नसतो प्रीतीला कदापी,
    प्रेत माझेच मी जाळणार आहे!!
    आणि
    घाव घाला रे कुठे ही कोणी ही,
    वेदना हा चाणक्य सोसणार आहे!!

    कविता आवडली………आणि वेदना चाणक्या सोसणार असेल तर आणखी घाव घालायला हरकत नाही म्हणतो !!! :)

  2. hirkani Says:

    mi hya saglya kavita wachlya ani sahaj wataley ki…..
    kadachit yewhadey prem aaplyawar koni kele astey tar….
    U GOT A BIG FAN!!!

  3. वाचून बघा Says:

    नमस्कार.

    तुमच्या गज़ला आवडलया, अजून नवनवीन काव्यप्रकार वाचायला आवडेल !

    असंच लिहित रहावे, शुभेच्छा.

  4. VISHAL.GUND Says:

    very nice


उत्तर नोंदवा