तसा राहिलो नाही!!

सोबती आता कशाला? तसा राहिलो नाही!!
आरती आता कशाला? तसा राहिलो नाही!!

थकलो जरा,  मग मी असा  थांबुन पाही,
थांबला तुम्ही कशाला? तसा राहिलो नाही!!

ऐकले तुम्ही कुणाला? जरी बोललो नाही,
भोवती येता कशाला? तसा राहिलो नाही!!

भावला मृत्यू मनाला!! तसा जगलो नाही,
गाळता अश्रु कशाला? तसा राहिलो नाही!!

थांबवा आता स्वतःला!! तसा राहिलो नाही,
गोठवा आता मनाला!! तसा राहिलो नाही!!

3 प्रतिसाद to “तसा राहिलो नाही!!”

  1. वाचून बघा Says:

    व्वा ! प्रत्येक द्विपदी आवडली… असेच लिहित रहावे, ही विनंती !

  2. Prakash Ghatpande Says:

    आपुन बी बदल्लो जग बी बदाल्ल. कुनि कुनाच राहिले नाहि

  3. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे Says:

    मस्त, और भी आने दो !!!


तुमचा अभिप्राय नोंदवा