आयकर परतावा

मंडळी, 31 जुलै शेवटची तारीख आहे आयकर परतावा अर्ज भरण्याची. मला ना ही जबरा कटकट वाटते. साले पगारातुन न चुकता कर कापुन घेतात. सगळे उत्पन्नाचे स्त्रोत यांना माहित आहेत. तरीपण जादा कर कापला तर आम्हीच अर्ज करुन मागुन घ्यायचा. तुम्हाला काय वाटत? तुम्ही जर भारता बाहेर काम करत असाल तर त्या त्या देशामधला या बाबतीतला कायदा काय आहे?

पुनरागमन

नमस्कार मंडळी,

गेल्या सहा-सात महिन्यात या अनुदिनीवर काहीच नाही लिहिले. खरतर न लिहिण्यामागे असे काही खास कारण नव्हते. पण लेखन झाले नाही. तसा मी काही लेखक वगैरे नक्कीच नाही. पण अनुदिनीवर लेखन करणे तसा आनंद दायक अनुभव आहे. तो आनंद मला परत मिळवायचा आहे आणि म्हणुनच माझ्याच अनुदिनीवर मी पुनरागमन करतो आहे. डोक्यात विषय अनेक असतात पण लेखन केले जातेच असे नाही. बघु कसं जमतय ते.