राख करुनी मला, सोडला गाव मी ,
माफ करुनी तुला, मोडला डाव मी !!
चुकले माझे प्रेमाचे मार्ग ते जूने ,
ज्ञात असुनी मला, घेतला ठाव मी!!
खेळ खळतो शब्दांचे, आज मी जरी,
शब्द होता तुझा, सोसला घाव मी !!
व्यक्त होता तुझी, प्रीत ती वेगळी
मोल नव्हते मला, जाणला भाव मी !!
पुसुनी अश्रु आता, तोडतो नाळ ती,
गाव आता नवे, मांडला डाव मी!!
