सहकारी गृहसंस्था

महाराष्ट्रात नगरात/महानगरात राहणारे जवळपास सर्व नागरीक कोणत्या ना कोणत्या सहकारी गृहसंस्थांचे सभासद असतात. गंमत म्हणून महाजालावार माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर फारशी काही माहिती हाती आली नाही.

मला काय हवे आहे?

  1. सहकारी गृहसंस्थांमध्ये समिती कशी ठरवतात?
  2. समितीमधे कोण कोणती पदे असतात? त्यांच्या भुमिका काय असतात?
  3. या समित्यांना काय बंधने असतात?
  4. संस्थांचे व्यवस्थापन करण्याचे महत्वाचे नियम कोणते?

या बद्दल कोणाला माहिती असल्यास येथे द्यावी हि नम्र विनंती.



आयकर परतावा

मंडळी, 31 जुलै शेवटची तारीख आहे आयकर परतावा अर्ज भरण्याची. मला ना ही जबरा कटकट वाटते. साले पगारातुन न चुकता कर कापुन घेतात. सगळे उत्पन्नाचे स्त्रोत यांना माहित आहेत. तरीपण जादा कर कापला तर आम्हीच अर्ज करुन मागुन घ्यायचा. तुम्हाला काय वाटत? तुम्ही जर भारता बाहेर काम करत असाल तर त्या त्या देशामधला या बाबतीतला कायदा काय आहे?