राजकिय विचार – विकृती की आपली आवड?

नमस्कार मंडळी,

हिंदुत्ववाद्यांना नथूराम आणि हिटलर का आवडतात? या चर्चेमध्ये बरेच प्रतिसाद आले. वाद प्रतिवाद झाले. मुळात आवड-निवड सापेक्ष असल्याने या आणि अशा विषयांना अंत नाही. या चर्चांच्या निमित्ताने एक विषय मात्र डोक्यात आला. तो म्हणजे, राजकिय नेते हे समाजतल्या मानसिकतेचे चेहरे असतात. कोणाला कोणता नेता आणि विचार आवडावेत अथवा आवडू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण अनेक वैयक्तिक एकत्र येऊन समाज बनतो आणि विचारधारांचा अभ्यास होण्या ऐवजी दुसर्‍याचे उणेपण दाखवणे जास्त होते. राजकारणावर चर्चा करणे ठिक आहे. पण आपल्याला खरच या राजकिय नेत्यांसारखे बनणे जमणार आहे का? हा एक विचार आहे. कोणामध्ये इतकी हिंमत आहे की जाऊन आजचे राजकिय वैचारिक चित्र बदलता येणार आहे? कोण हरीचा लाल आहे जो म्हणतो आज भारतात सर्व छान चालले आहे अथवा सुरळीत चालले आहे?

घरापासून ते राष्ट्राच्या सर्वोच्च पदाच्या निवडी पर्यंत जो विरोध असतो तोचमुळी वैचारिक असतो. खास करून राष्ट्राचा जेंव्हा विचार असतो तेंव्हा राष्ट्राचे हित, विकास हेच सर्वांचे ध्येय असते. पण विचार प्रवाह मात्र वेगळे असतात. कोणाला कोणत्या विचार प्रवाहात सामील व्हायचे आहे तो वैयक्तिक विचारांचा भाग आहे. त्यासाठी आपण आपल्या विचारांचे समर्थन करणे योग्य. दुसर्‍याचे मुद्दे चुकीचेच आहेत असे मोठ्याने ओरडून आपले मुद्देच बरोबर आहेत असे नक्कीच सिद्ध होत नाही.

वर म्हटल्या प्रमाणे हे असे विषय अंतहिन आहेत. त्यापेक्षा या राजकिय नेत्यांच्या यशापयशाचा विचार केल्यास आपल्याला अनेक नवे अथवा अभ्यासपूर्ण मुद्दे मिळतील. खाली एक छोटी यादी देतो आहे. त्यातले काही नेते अलिकडचे आहेत. पण त्यांच्या राजकिय विचारांचा प्रभाव बराच परिणाम कारक आहेत. एखाद्या नेत्या बद्दल लिहिताना आपण थोडा अभ्यास करू आणि मगच लिहू. उगाच वैयक्तिक आकसापोटी नको.

 1. गांधीजी – जगातल्या काही महान नेत्यां पैकी एक. त्यांचे कोणते विचार असे होते ज्यामुळे काही जणांना विकृत म्हणवले जात आहे? येथे गांधीजी कसे महान होते अथवा नव्हते हा मुद्दा अपेक्षीत नाहीये. पण त्यांची हत्या/वध झाली/झाला हे सत्य आहे. आज सुद्धा त्यांच्या आडनावाचा करिश्मा आहे हे सुद्धा सत्य आहे.
 2. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?
 3. हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता? लोकांना युद्धात ढकलणारा हिटलर आणि शतकानूशतके जगातल्या अनेक राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची हत्या करणारे ब्रिटिश. यांच्यामध्ये महान कोण? अथवा जास्त विकृत कोण? फक्त रक्तपात न होणे हेच काय ते महानतेचे प्रतिक आहे काय? असे असेल तर महाकाव्यांमधले युद्ध आपण आवडीने का ऐकत आलो आहोत? ते सुद्धा विकृतच नाही का?
 4. नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत? पर्यायी नेतृत्व शक्यच नव्हते की जनतेला दुसरे कोणी नकोच आहे की इतरांमध्ये तेवढी कुवतच नाही? या लोकांच्या यशाचे नेमके कारण काय असावे?
 5. लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

राजकिय नेत्यांची बाजू घेताना आपल्याला खरच त्यांची सर्व मते पटली आहेत का? हे कितपत महत्वाचे आहे? एखादी व्यक्ति मग ती राजकिय असली तरी त्यांचे सगळेच गुण आपल्याला आवडायला हवे आहेत का? की त्यांच्यामधले आपल्याला आवडणारे/पटणारे मुद्दे/गुण आपण घ्यावेत आणि बाकिच्यांबद्दल वाद न घालता आपण त्यांच्या विचारांना सुद्धा मान द्यावा? तुम्हाला काय वाटते?

6 thoughts on “राजकिय विचार – विकृती की आपली आवड?

 1. सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते. या त्यांच्या वैचारिक अपयशा बद्दल कोणते मुद्दे महत्वाचे आहेत?

  मुळातच सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी यांना “वैचारिक आपयश” आले असे मला वाटत नाहि, याउलट आज गांधीच्या तत्त्वांना आणि विचारांना अपयश येत आहे हे स्वतः कांग्रेसने एकदा तपासने गरजेचे आहे. गांधिजींची किती तत्त्वे व्यवहारिक जीवनात जपली जातात याचा विचार व्हावा. दैंनदिन जिवनात त्यांच्याच अनुयायांकडून सर्रासपणे ति तुडविली जात असल्याचे आम्ही पाहतोच आहोत. हे अपयश महात्मा गांधीच्या विचारांचे नव्हे तर काय?

  • तुमचे म्हणणे बरोबर आहेच. पण हे तत्वतः मान्य होत नाही राजकिय पातळीवर. गेली ६ दशके आपण हे पहात आलो आहोत. या उलट काँग्रेसच्या पिढ्याच्या पिढ्या पोसल्या जात आहेत. या नेत्यांच्या पिढ्यांचा कुठे मागमुस सुद्धा नाही.

 2. काँग्रेसच्या पिढ्याच्या पिढ्या पोसल्या जात आहेत त्या गांधींच्या तत्वांवर नाही तर गांधींच्या नावावर तेही मुख्यत: गावाकडील अक्षिशित गरीब जनतेमुळे.

 3. सावरकर/सुभाषचंद्र बोस ह्यांनी देशासाठी आपल्या आयुष्याची आणि संसाराची होळी केली आणि ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती. महात्मा गांधी बद्दल सुद्धा हे लागू होईल पण कॉंग्रेस आणि नेहेरू ह्यांनी त्याच्या एकदम उलटे केले. नेहेरुचे स्वातंत्र्य मिळवण्यात काय योगदान आहे ह्याचा आभ्यास होणे गरजेचे आहे. ते एक लोकप्रिय नेते होते असे म्हणता येईल पण ते खरच निस्वार्थी पणे उभे राहिले का? का त्यांच्या सत्तालोलुपता मुळे देशाला आज हे दिवस पाहावे लागत आहे? हा तसा वादाचा मुद्दा आहे पण ह्यावर विचार होणे गरजेचे आहे. गांधी घराण्याची सत्ता लोलुपता मुळेच ते आज ६० वर्षापासून सत्ता उपभोगत आहेत असे मला वाटते…..

  सुभाषचंद्र बोस, सावरकर आणि समविचारी – या नेत्यांना आज सुद्धा १००% समाज मान्यता नसते.

  ह्याला प्रमाण काय? आपण म्हणता म्हणून कि सार्वमत घेतले गेले आहे. गांधीजींना कुठे १००% समाज मान्यता होती. का ते सुद्धा त्यांच्या विचारांचे अपयश होते?

  हिटलर – चर्चिल – हे दोन आणि असे काही नेत त्या काळातले जगातले सर्व प्रकारचे राजकारण ढवळून काढणारे आहेत. लोकांवर त्यांचा एवढा का प्रभाव होता?

  दोघेही उत्तम नेते होते असे म्हणता येईल, जनमानसावर कशी पकड मिळवायची हे त्यांना चांगले ठाऊक होते. विकृत होते कि नाही हा मुद्दा वेगळा, त्यांनी जनतेचे चांगले केले कि नाही हा वेगळा मुद्दा.. अमेरिकेच्या दडपशाही ला तुम्ही काय म्हणाल….सगळी अमेरिका विकृत आहे कि काय. आज दुसर्या महायुद्ध नंतर सगळ्यात जास्त नरसंहार हा अमेरिकेने केला आहे….ह्यावर कधी कुणी का बोलत नाही.

  नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका यांच्या मध्ये असे कोणते नेतृत्व गुण आहेत जे अनेक दशके भारतीयांना लोकशाहीचे संरक्षक म्हणून योग्य वाट आले आहेत?

  तुमचा हा मुद्दा मला खरच हास्यास्पद वाटतो आहे. इंदिरा, राजीव, सोनिया, राहूल/प्रियंका ह्यांना नेहरूंची आणि गांधी आडनावाची पुण्याई मिळाली आहे. हे विसरू नये. कदाचित ह्याच उद्देशाने नेहेरुनी सुरवातीला पंतप्रधान पद साठी हट्ट/राजकारण केले असेल. तसेच नेतृत्व गुण जर तुम्ही म्हणत असाल तर सोनिया, राहूल/प्रियंका ह्यांचामध्ये कुठेलेही नेतृत्व गुण नाही आहेत. ते फक्त गांधी घराण्याचे आहेत म्हणून ते राजकारणात आहेत. कारण नेहेरुनी आपली सगळे घराणे फक्त राजकारण करेल असेच ठरवले असेल….भ्रष्टाचार करून निवडणूक कशी जिंकता येते हे आपण नेहेमी बघतच आलो आहे. ह्यात नेतृत्व गुण लागत नाही, लागतो तो पैसा आणि सत्ता….

  लालू, मायावती, मुलायम, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे इत्यादी नेते काही जणांना प्रचंड विकृत वाटत आले आहेत आणि राजकारणात यश अपयश यांनी चाखले आहे. त्यांच्या या यशापयशाचे कारण काय असावे?

  भारतातील राजकारण हे आता फक्त विकृत लोकांच्या हातात गेले आहे. कुठलाही विचारावर ते आता अवलंबून नाही. व्यक्तिगत स्वार्थावर ते चालत आहे. हि भारत देशाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.

  ह्या विषयावर मी अजून लिहीनच पण वेळेअभावी आता इतकेच.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s