बाई

मराठी भाषेत, बाई म्हटलं की प्रत्येकाला माहित आहे कि बाई म्हणजे स्री. पण थोडा फरक करायचा म्हटलं तर ज्यांचे शालेय शिक्षण मराठी शाळेत झाले आहे त्यांना बाई म्हटले की आठवतात त्या म्हणजे शिक्षिका. अन मग बाई या शब्दाचा अर्थ फक्त स्री न राहता एक गुरु हा होतो. आज जेंव्हा हा विचार मनात आला की बाई म्हटल्यावर पटकन गुरु ही प्रतिमा सर्व मराठी लोकांच्या मनात उभी नाही रहात. एकतर एक सर्वसामान्य स्त्री, कामवाली बाई, इतर कसली तरी बाई. पण बाई म्हटलं की आदर हि भावना पटकन का नाही? मुळातच गंमत अशी वाटली की शाळेत शिक्षकांना गुरुजी जुनाट वाटतं म्हणून सर म्हणायला सुरु केलं पण शिक्षिकांना? त्यांनी काय घोडं मारलं होत? इंग्रजी शाळेत एकतर मिस, अथवा टिचर. मग टिचर म्हटलं की त्यात स्त्री पुरुष हा भेदभाव नाहीच. पण आज इतक्या वर्षांनी जेंव्हा विचार करतो तेंव्हा मला मनाला शिक्षिकांना बाई म्हणण फारस पटत नाहीये. शिक्षिकांचा दर्जा नक्कीच वेगळा आहे. अगदी गुरु – माता या समान आहे. मला वाटतं आपण थोडा पुढाकार घेऊन शिक्षिकांना बाई म्हणण बंद करायला हवं, एकतर मग जस शिक्षकांना सर म्हटलं जातं तस सरसकट टिचर. आपल्याकडे जर योग्य आदरार्थी शब्द नसेल तर उसना घ्या. पण शिक्षिकांना नुसतं बाई म्हणू नका…

One thought on “बाई

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s