अनुभव

अनुभव, स्वत:चे कि वाचलेले? यामधले कोणते अनुभव श्रेष्ठ? या बद्दल माझ्या मनात नेहमीच एक द्वंद्व सुरु असतं. स्वत:चे अनुभव हे स्वत:च्या कृतीचे फलित असतात तर वाचलेले अनुभव हे इतरांच्या. प्रत्येक व्यक्ती ज्या प्रमाणे एक स्वतंत्र आणि वेगळे व्यक्तिमत्व असते त्याच प्रमाणे प्रत्येक प्रसंग सुद्धा वेगळा असतो. त्यातून येणारे अनुभव सुद्धा वेगळे असतात. हे जरी खरे असले तरी श्रेष्ठ कोण हा मुद्दा काही पाठ सोडत नाही.

शेवटी वाचलेले अनुभव हे सुद्धा कोणाचे तरी अनुभवच असतात. तरी सुद्धा मन तयार होत नाही मानायला. एक मान्य आहे की ते मार्गदर्शक ठरू शकतात पण तेच फक्त खरे आहेत हे मात्र अमान्य आहे.

तुम्हाला काय वाटते?

— चाणक्य ….

Advertisements

बरेच दिचसांनी

आज बर्‍याच दिवसांनी अनुदिनी पाहणे झाले :). कामाचा आवाका आणि मराठी संकेतस्थळांवरचे अतिरेक यामुळे लेखन थोडे कमीच झाले आहे. बघु नवे काही लिहायला जमते का?
अरे हो, उपक्रम संकेतस्थळाला शासनाचा पुरस्कार मिळाला हे अनेकांना माहित असेलच.

पुनरागमन

नमस्कार मंडळी,

गेल्या सहा-सात महिन्यात या अनुदिनीवर काहीच नाही लिहिले. खरतर न लिहिण्यामागे असे काही खास कारण नव्हते. पण लेखन झाले नाही. तसा मी काही लेखक वगैरे नक्कीच नाही. पण अनुदिनीवर लेखन करणे तसा आनंद दायक अनुभव आहे. तो आनंद मला परत मिळवायचा आहे आणि म्हणुनच माझ्याच अनुदिनीवर मी पुनरागमन करतो आहे. डोक्यात विषय अनेक असतात पण लेखन केले जातेच असे नाही. बघु कसं जमतय ते.