प्रसार माध्यमे आणि आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी

भारतात किंवा भारताबाहेर राहताना एक फरक नेहमी जाणवतो. तो म्हणजे प्रसार माध्यमामध्ये आपला देश आणि इतर देश या बद्दलच्या बातम्या. भारताबाहेर सामान्यपणे आपला देश कुठे पुढे आहे. आपले शेजारी देश, महासत्ता आणि आपली वाटचाल याबद्दल नागरिकांना समजेल अशा भाषेत माहितीवजा बातम्या पहायला मिळतात. मला वाटते की नागरिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकीयदृष्ट्या साक्षर करण्यासाठी हे फार गरजेचे आणि महत्वाचे आहे.
नवे माहिती व प्रसारण मंत्री याची काळजी घेतील अशी माफक अपेक्षा आहे.

Advertisements

ईमेलने लेखन

चीनमध्ये आल्यापासून ब्लॉगवर लिहायचे कसे हा एक प्रश्नच होता. एक चिनी मित्राने तो काही प्रमाणात सोडवला. मला स्वतःला विंडोज लाईव्ह रायटर वापरायला आवडतो. पण आता अशक्य आहे. म्हणून मग संधी मिळताच ईमेलने अनुदिनी लेखन अ‍ॅक्टिवेट केले. त्याचाच हा एक प्रयोग. बघु जमतं का ते.

-चाणक्य

सहकारी गृहसंस्था

महाराष्ट्रात नगरात/महानगरात राहणारे जवळपास सर्व नागरीक कोणत्या ना कोणत्या सहकारी गृहसंस्थांचे सभासद असतात. गंमत म्हणून महाजालावार माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर फारशी काही माहिती हाती आली नाही.

मला काय हवे आहे?

  1. सहकारी गृहसंस्थांमध्ये समिती कशी ठरवतात?
  2. समितीमधे कोण कोणती पदे असतात? त्यांच्या भुमिका काय असतात?
  3. या समित्यांना काय बंधने असतात?
  4. संस्थांचे व्यवस्थापन करण्याचे महत्वाचे नियम कोणते?

या बद्दल कोणाला माहिती असल्यास येथे द्यावी हि नम्र विनंती.आयकर परतावा

मंडळी, 31 जुलै शेवटची तारीख आहे आयकर परतावा अर्ज भरण्याची. मला ना ही जबरा कटकट वाटते. साले पगारातुन न चुकता कर कापुन घेतात. सगळे उत्पन्नाचे स्त्रोत यांना माहित आहेत. तरीपण जादा कर कापला तर आम्हीच अर्ज करुन मागुन घ्यायचा. तुम्हाला काय वाटत? तुम्ही जर भारता बाहेर काम करत असाल तर त्या त्या देशामधला या बाबतीतला कायदा काय आहे?